RajThackeray | राज यांनी केलेल्या विधानानंतर हनुमान चालिसाची मागणी वाढली | Sakal Media
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यांच्यासमोर भोंगे लावून हनुमानचालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलेले आहे. दुसऱ्या बाजूला राज यांनी केलेल्या विधानानंतर हनुमान चालीसा आणि हनुमान स्त्रोत्र या पुस्तकात देखील वाढ झालेली आहे.